सिल्लोड:- सोयगाव(प्रतिनिधी) ग्राम स्वच्छता ही सांगून होत नाही तर त्यासाठी स्वतः पासून सुरवात करावी लागते. विशेतः युवकांनी स्वतः पुढाकार घेऊन ग्राम स्वच्छता करावी. असे विचार मा. जि.प. अध्यक्ष तथा अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. रंगनाथनाना काळे यांनी मांडले. ते सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या माळेगाव येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटक म्हणून बोलत होते.यावेळी सोयगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ. रावसाहेब बारोटे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहरअध्यक्ष रविंद्र काळे,सतीशचंद्र काबरा,
श्रीराम पाटील, सरपंच दादाभाऊ जाधव, उपसरपंच विरेंद्र अहिरे, पोलीस पाटील मंगलदास अहिरे, ग्रामसेवक प्रफुल्ल गोरे, मुख्याध्यापक पी.पी. साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना सर्व जि.प. सदस्यांसह आदर्श गाव हिवराबळी येथे भेट दिली. त्याभेटीमध्ये मला गावातील प्रत्येक नागरिक स्वतः कचरा साफ करताना दिसले. आज ही या शिबिराच्या माध्यमातून गावाची स्वच्छता तर करायची परंतु गावातील नागरिकांचे स्वच्छतेबाबत प्रबोधन देखील करायचे आहे. या शिबिराच्या माधमातून गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या आरोग्य तपासणीमुळे गावातील बऱ्याच महिलांना आपला रक्तगट, हिमोग्लोबिन काय आहे हे कळणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. रावसाहेब बारोटे यांनी तर सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ संतोष तांदळे यांनी केले. शेवटी कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रदीप गोल्हारे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाधिकारी डॉ ग्यानबा भगत, राष्ट्रीय सेवा योजना सल्लगार समिती सदस्य डॉ. सैराज तडवी, प्रा. श्रीकृष्ण परिहार. डॉ. विनोद बारोटे, डॉ. शंतनु चव्हाण, प्रा. ज्योती स्वामी, श्री. गजानन क्षिरसागर, गौरव वाघ यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.
