घोसला येथील आरोग्य उपकेंद्र प्रशासकीय ढिसाळ यंत्रणेमुळे नऊ वर्षापासून बेवारस..

 




 सोयगाव तालुक्यातील घोसला येथील नऊ वर्षांपूर्वी बांधकाम होऊन देखील आरोग्य विभागाला सोयगाव तालुक्यातील घोसला येथील आरोग्य उपकेंद्र बेवारस पडलेले आहे.

श९ वर्षा पासून लाखो रुपये निधी खर्च करून उभारलेल्या आरोग्य केंद्रात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे..

काही दिवसापूर्वी या आरोग्य उपकेंद्रात चक्क कुजलेल्या अवस्थेत कुत्रा आढळून आल्याची खळबळ उडाली होती...

वेळोवेळी प्रशासकीय यंत्रणेला लेखी स्वरूपाद्वारे व तोंडी सांगून सुद्धा प्रशासकीय यंत्रणा याकडे जाणून-बुजून 

दुर्लक्ष करत असल्याचे समजत आहे ..

आरोग्य केंद्राच्या लापरवाही विषयी घोसला ग्रामस्थ वासिय संताप व्यक्त करीत आहेत..

कोरोना सारख्या संसर्गजन्य आजारामुळे घोसला वासियांचे आरोग्य ठेकेदार आणि आरोग्य विभागाच्या ताबा पट्टीच्या वादात अडकले आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठ्या निधीची तरतूद करून घोसला आरोग्य उपकेंद्राची वास्तू उभारण्यात आली होती मात्र या वस्तूचे काम ठेकेदाराने अपूर्ण अवस्थेत केल्याने आरोग्य विभागाला या इमारतीचा ताबा देण्यात आला नाही .

त्यामुळे लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेली इमारत नऊ वर्षापासून धुळखात पडली आहे .

इमारतीचे दरवाजे खिडक्या आदी साहित्यांची तोडफोड झाल्याने केंद्राची अवकाळा सुरू झाली आहे.

 त्यामुळे आरोग्य विभागाने या आरोग्य उपकेंद्राला ताब्यात घेऊन कार्यान्वित करावे अशी मागणी गावकरी करीत आहेत..

घोसला येथील आरोग्य उपकेंद्र चालू न झाल्यास येणाऱ्या २६ जानेवारीला तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असेही सरपंच गणेश माळी मा. सरपंच सुवर्णा पा. पवित्रा पा. सोमु तडवी , सतीश सोनवणे यांनी सांगितले...

Post a Comment

0 Comments