सोयगाव अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी -गोकुळसिंग राजपूत

 




सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील गोकुळसिंग राजपूत यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या सोयगाव तालुका अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीपबाबा खांडापूरकर लातूर यांच्या हस्ते नुकतेच निवड करण्यात आली.याविषयी सविस्तर माहिती अशी की, मौजे कुंभारी या. जामनेर जि.जळगांव येथे 24,25 डिसेंबर रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राज्यस्तरीय अभ्यास शिबीर संपन्न झाले आहे.

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन स राज्यस्तरीय

या शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रदीप पाटील खंडापूरकर (बाबा), माजी सभापती बबलूशेट भन्साळी फत्तेपूर,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. अरूण देशमुख यांचे हस्ते अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे औरंगाबाद व सोयगाव तालुका अध्यक्ष म्हणून यांची निवड करण्यात आली असून त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले आहे.या दोन दिवसीय आयोजित शिबिरात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात उपस्थित पदाधिकारी यांना सविस्तर माहिती देण्यात आली.यावेळी राष्ट्रीय समन्वयक गिरीराज महिराज राष्ट्रीय सरचिटणीस अमोल नानजकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष शोभाताई बल्लाळ, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अरुण देशमुख अजिंठा, प्रदेश महिला अध्यक्षा एॅड राणीताई स्वामी, प्रभाकर साळवे प्रदेश सरचिटणीस म.रा,औरंगाबाद महिला अध्यक्षा अंजनाताई राजपूत अजिंठा, श्रावण कुळे, प्रदेश युवती अध्यक्ष शेख सनाताई पेठ, मराठवाडा विभाग प्रमुख पंडित तिडके, सोयगाव तालुका अध्यक्ष चेतन राठोड,शेख अज्जर फर्दापूर,यांचे सह राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीतील पदाधिकारी तथा संपूर्ण महाराष्ट्रातून पदाधिकारी कुंभारी ता जामनेर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून मान्यवरांनी याप्रसंगी गोकुळसिंग राजपूत यांना निवडीच्या शुभेच्छा दिल्या

Post a Comment

0 Comments