सोयगांव तालुक्यातील कंकराळा, सावरखेडा/लेनापूर, ठाणा/वरखेडी खु., वाडी/सुतांडा व वणगांव/घोरकुंड या पाच गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली आज आलेल्या निकालात या पाचही ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने बाजी मारल्याने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम राहिले आहे.
दरम्यान नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संपर्क कार्यालयात तालुकाप्रमुख प्रभाकर काळे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शहरप्रमुख संतोष बोडखे, गटनेते अक्षय काळे, नगरसेवक हर्षल काळे, गजानन कुडके, राजू दुतोंडे, कदीर शहा, दिलीप देसाई, लतीफ शाह,अमोल मापारी, कुणाल राजपूत, शेख बबलू, जावेद पिंजारी आदींसह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
