सिल्लोड:- तालुक्यातील भराडी येथे विकासकामांचे व्रत हाती घेऊन , किर्तनासारखे प्रभावी माध्यम वापरून समाजसुधारणेचे कार्य करणारे संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ज्ञानविकास प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी समर्थ गोरे व पियुष भोसले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शाळेचे सहशिक्षक श्री.सोनवणे ए. डी. यांनी महान संत गाडगेबाबा यांच्या जीवनकार्याला उजाळा देताना अज्ञान,अंधश्रद्धा, अस्वच्छता यांनी बुरसटलेल्या समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेऊन किर्तनासारखे प्रभावी माध्यम वापरणारे तसेच ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब
,दिनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान,अंधश्रध्दा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे सत्पुरुष! म्हणून जय गोपाला जय गाडगेबाबा अशा घोषणा देण्यात आल्या.त्यानंतर श्री.सोनवणे यांनी संत गाडगेबाबा यांचे प्रेरणादायी विचार स्पष्ट करताना शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे,शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण ह्या जगात कशासाठी आलो हे कळते,माणसाचे खरोखर देव कोण असतील तर आई-बाप,अडाणी राहू नका मुलाबाळांना शिकवा,धर्माच्या नावाखाली कोंबड्या,बकर्यांसारखे बळी देऊ नका असे स्पष्ट केले.' तीर्थी धोंडोपाणी देव रोकडा सज्जनी'
असे सांगत दीन, दुबळे,अनाथ,अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणून गाडगेबाबांची महती व्यक्त केली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली त्यात ऋतुजा महाजन,वेदिका गवळी,रोशनी भोजने,शिवानी भोजने,देवेंद्र निकम,भावेश साळवे,सोहम आग्रे,तुषार जाधव,सर्वेश भाले, ओम मुरकुटे, सुमित काकडे,सोहम साळवे,ओम आग्रे,साई राकडे,सुजित खांडवे, सोहम चाथे,लक्ष गवळे, वैभव दौड, अथर्व पुरी,साई भोसले,अजिंक्य काकडे,देवराज भालकर, निवृत्ती पवार,संदेश भिवसने, आशिष शेळके,साई चाथे,तौसीम शेख,अमजद ताज मोहम्मद,संस्कार सपकाळ यांचा समावेश होता भाषणात सहभागी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी ज्ञानविकास विद्यालयाचे मुख्याध्यापक, सहशिक्षक ,शालेय वाहनचालक मालक यांची उपस्थिती होती.
