सामाजिक श्रमदानातुन गोगडी-सोयगांवच्या श्री मारोती मंदिराच्या बांधकामाचे काम अंतिम टप्प्यात.

 


सोयगांव जवळ गोगडी नावाचे गाव होते, ते सद्या बे चिराग अवस्थेत आहे.

परंतु त्या ठिकाणचे ग्राम दैवत असलेले श्री.हनुमानजी हे जागृत आहेत. त्याच्या बर्याच कथा ही आहेत. अशा जागृत दैवताला उन्हात पाहुन, आजु-बाजूच्या शेतकर्यांनी व सोयगांवतील नागरीक व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मंदिराचे बांधकाम पुर्णत्वास न्यावयासाठीची शक्ती हनुमंत रायाने त्यांना दिली. व श्रमदानातुन मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात पोहचले आहे.

आज मंदिराकडे जाण्यासाठीच्या दिशादर्शक फलकाचे अनावरण करण्यात आले. त्या प्रसंगी गावातील सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी बंधु मोठ्या संखेने उपस्थित होते.

व तसेच ज्या कुण्या श्री.हनुमंत भक्ताला साहित्य,वस्तू,द्रव्य,अर्थ,श्रमदान करायचे असेल त्याने मोठ्या उत्साहाने पुढे येउन दान करावे. असे आवाहन याप्रसंगी भिमाजी तेली व सामाजिक कार्यकर्ते सुनिल गावंडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments