.न्यायालयीन व्यवहार मराठी भाषेतून ऐतिहासिक निर्णय : डॉ. दिलीप बिरुटे यांचे प्रतिपादन,,,


 न्यायालयीन व्यवहार मराठी भाषेतून ऐतिहासिक निर्णय : डॉ. दिलीप बिरुटे यांचे प्रतिपादन  


सोयगाव:-दि.२४:-    प्रतिनिधी:23/01/2023 रोजी दुपारी 2.15 वाजता मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर, सोयगाव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथील (मराठी विभाग प्रमुख) प्रा. डॉ. दिलीप बिरुटे हे होते.ते म्हणाले की राज्य शासनाचा  न्यायालयीन कामकाज मराठीतून हा ऐतिहासिक निर्णय आहे, या निर्णयाचा फायदा सर्वसामान्य ,गोरगरीब जनतेला होत आहे .आपले म्हणणे आपला वकील योग्य रीतीने मांडतो की नाही ते ह्या निर्णयामुळे पक्षकारास कळते आहे. तसेच माननीय न्यायाधीशाने काय निर्णय दिलाआणि त्यातील त्रुटी काय आहेत हे आता स्वतः  पक्षकारस समजू लागले आहे . मराठी भाषा अतिशय प्राचीन असून समृद्ध भाषा आहे .महाराष्ट्रातल्या संतांनी मराठी भाषेत ज्ञानाचे भंडार आणि  भक्तीचा सागर आहे . अभंग, ओव्या , हरिपाठ या माध्यमातून भक्ती आणि जीवन  यांचा मिलाप घडवून  आदर्श जीवनमूल्य  शब्दांकित केले.मराठी माणसाने मराठी भाषेचा जागर तेवत ठेवला पाहिजे "असे डॉ. बिरुटे म्हणाले . डॉ.रमेश औताडे  यांनी मराठी भाषा संवर्धनाबाबत सविस्तरपणे मार्गदर्शन केले . कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माननीय पिठासीन अधिकारी (माननीय न्यायमूर्ती ) श्री. ए.बी. इंगोले उपस्थित होते.श्री इंगोले अध्यक्ष समारोप करताना म्हणाले की "न्यायालयीन कामकाजाची भाषा मराठी झाल्यामुळे  सर्वसामान्य जनतेला याचा फायदा झाला आहे .निकालाबाबतचा अन्वयार्थ समजून घेणे सहज सुलभ झाले आहे".तसेच याप्रसंगी सहाय्यक सरकारी अभियोक्ता, वकील संघ सोयगाव येथील विधीज्ञ, न्यायालयात उपस्थित असलेले पक्षकार तसेच न्यायालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments