तिरुपती अर्बन पतसंस्थेने मयत सभासद कर्जदाराच्या वारसास 5 लाख रु .रकमेचा चेक अदा केला.

 


औरंगाबाद प्रतिनिधी- विजय काळे 

सोयगाव :शहरातील येथील तिरुपती अर्बन पतसंस्थेच्या मयत सभासद गोविंद चतरू राठोड रा जरंडी यांच्या पत्नी व कुटुंबास संस्थेने अपघाती विमा प्रतिनिधी.पांडुरंग दौलत बारी यांच्या मार्फत न्यू इंडिया इन्शुरन्स कं चा काढला होता.

माहे मे महिन्यात सभासद गोविंद राठोड यांचा अपघाती मृत्यू झाला होता, त्याचा संस्थेने विमा काढलेला असल्यामुळे संस्थेने दावा केल्यामुळे मयत सभासदाचे पाच लाख संस्थेस प्राप्त झाल्याने संस्थेने वारसास पत्नी व मुलगी यांना. यावेळी संस्थेचे चेअरमन रामदास लालचंद राजपूत यांनी सदर रकमेचा चेक कुटुंबास अदा केला.आणि यापुढे प्रत्येक सभासदांनी संस्थेशी व्यवहार करावा जेणेकरून प्रत्येकाचा विमा काढला जाईल असे सांगितले.

संस्थेचे चेअरमन व्हॉईस चेअरमन व संचालक मंडळ यांनी सभासदाचे कर्जदरंचे हिता साठी विमा काढण्याचे निर्णय घेतले आहे व नगरसेवक अशोक सुखदेव खेडकर यांनी यावेळी कुटुंबास विमा काढल्यामुळे हातभार लाभला आहे. त्यामुळे प्रत्येक सभासदांनी अपघाती विमा काढावा असे आवाहन केले.

तेव्हा सोयगाव पंचायत समिती सदस्य संजीवन सोननवणे,भिवा चव्हान संस्थेचे कर्मचारी रवींद्र साखळे,गणेश तेली, विकास देसाई तसेच सभासद दत्तात्रय काटोले, भूषण वाघ,भगवान वाघ, संजय जाधव व इतर सभासद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments