-खुल्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ करतांना घोसला येथील गावकरी मंडळी
औरंगाबाद प्रतिनिधी - विजय काळे
सोयगाव तालुक्यातील घोसला येथे सोपानदादा गव्हांडे(पाटील)चषक २०२२ खुल्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेचे क्रिकेट सामने १५डिसेंबर ते ८ जानेवारी २०२३ पर्यत होणार आहेत या ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होण्यासाठी मराठा प्रतिष्ठाण व घोसला गावकरी मंडळी यांनी पुढाकार घेतला असून विशेष या स्पर्धेत पंचक्रोशीतील व तालुका बाहेरील क्रिकेट मंडळानी आपला सहभाग नोंदवावा असे आव्हान स्पर्धेच्या आयोजकांकडून करण्यात आले आहे यामुळे तरुण क्रिकेट प्रेमींना खेळाडू वृत्तीस चालना मिळण्याचे काम होणार असून या स्पर्धेत अनेक क्रिकेट मंडळ आपला सहभाग घेत आहेत स्पर्धा संपन्न होण्यासाठी घोसला येथील सरपंच गणेश माळी, आप्पा वाघ,ज्ञानेश्वर गवळी, संदीप पाटील,ज्ञानेश्वर युवरे, योगेश बावस्कर,अमोल बोरसे, प्रमोद बावस्कर,गणेश गवळी,लक्ष्मन अर्जुन,प्रमोद वाघ,समाधान गव्हांडे,समाधान बावस्कर,नवल बावस्कर,सतीश सोनवणे,धनराज तरळ,आबा उगले,राजू पंढरी,निवृत्ती सागरे,सोनू तडवी,सोपान गाडेकर,भैय्या तडवी,शाहरुख तडवी,कलिम तडवी,मुस्तकीन पटेल,राहुल तडवी ,राजू तडवी हे व इतर परिश्रम घेत आहेत.
