बहिणीच्या नवऱ्याची तीन मामासह मेव्हण्याला मारहाण




वाशिम जिल्हा 

अजय गायकवाड 

मालेगांव : 23 डिसेंबर


तालुक्यातील कळमेश्वर गावात बहिण व पती यांच्यात सुरू असलेल्या भांडणाच्या कारणावरून 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता बहिणीच्या नवऱ्याने तीन मामासह मेव्हण्याला मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


या प्रकरणी अनिल अर्जुन धनगर, वय 24, रा. कळमेश्वर यांनी प्रल्हाद मोतीराम वंजारे, गणेश मोतीराम वंजारे, रमेश मोतीराम वंजारे, तिघेही रा. रेगाव आणि रामकिसन बन्सी काळे, रा. कळमेश्वर यांच्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून तक्रारदाराच्या बहिणीचा विवाह कळमेश्वर गावातील रामकिसन बन्सी काळे यांच्याशी झाला आहे. मात्र दोघांच्या नात्यात काही दुरावा निर्माण झाल्याने तक्रारदाराची बहीण तिच्या दोन मुलांसह तिच्या माहेरी राहत आहे. 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता तक्रारदार त्यांच्या घरी हजर होता. त्यावेळी रामकिसन काळे हे त्यांचे तीन मामा प्रल्हाद वंजारे, गणेश वंजारे व रमेश वंजारे यांच्यासह फिर्यादीच्या घरासमोर पोहोचले व त्यांनी पती-पत्नीमध्ये समेट घडवून आणण्यासाठी फिर्यादीला घराबाहेर बोलाविले. फिर्यादी घराबाहेर पडताच चौघांनी पती-पत्नीमधील भांडणामुळे चौघांनी फिर्यादीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. रामकिसन काळे व गणेश वंजारे यांनी फिर्यादीचे दोन्ही हात पकडून ठेवले.प्रल्हाद वंजारे याने फिर्यादीच्या उजव्या कानाजवळ हातातील दगडाने वार केल्याने तक्रारदार जखमी झाला. रमेश वंजारे याने फिर्यादीच्या छातीवर हातातील दगडाने मारहाण केली. अशा फिर्यादीवरून मालेगांव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा क्रमांक 541 / 2022 नोंदवून भादंवि च्या 324, 323, 504, 506, 34 कलमान्वये प्रकरण दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक गुणवंत गायकवाड करीत आहेत.

Post a Comment

0 Comments