छायाचित्र ओळ-मृत कृषी पर्यवेक्षक जगदीश जाधव
सोयगाव, दि.२४..सोयगाव कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक जगदीश जाधव यांचा कर्तव्यावर असतांना गुरुवारी (दि २२) दुचाकी वर अपघात झाला होता शनिवारी( दि.२४) त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूची बातमी मिळताच सोयगाव कृषी कार्यालयात हळहळ व्यक्त करण्यात आली होती..
सोयगाव कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक जगदीश जाधव(वय ५२) हे कर्तव्यावर असताना त्यांचा सोयगाव जवळील जंगलातांडा गावाजवळ गुरुवारी (दि.२१) दुचाकी अपघात झाला होता त्यांना तातडीने उपचारासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचार करण्यासाठी त्यांना औरंगाबादला हलविण्यात आले परंतु त्यांच्या मेंदूला गंभीर मार लागल्याने ते गंभीर झाले होते शनिवारी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे कृषी पर्यवेक्षक जगदीश जाधव(५२) हे फर्दापुर कृषी मंडळाचे कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा एक मुलगी असा परिवार होता शनिवारी रात्री अकरा वाजता त्यांचेवर मूळगावी मंगरूळ ता चिखली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.....
-----खराब रस्त्या मुळे दुसऱ्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू
सोयगाव - फर्दापुर या खराब रस्त्यामुळे त्यांचा दुचाकी अपघात झाला होता त्यामुळे सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक त्यानंतर आता कृषी कर्मचारी असा दुसऱ्या कर्मचाऱ्याचा खराब रस्त्यामुळे मृत्यू ओढवला आहे.....
