⭕ *भुसावळ विधानसभेची जागा पीआरपीला सोडा..अमळनेर येथे झालेल्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात केला ठराव..पीआरपीचा तालुका निर्धार कायॅकताॅ मेळावा संपन्न...*⭕

 


  ( अमळनेर शहर प्रतिनिधी द्वारा खास बातमी )   

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]  

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:१० माचॅ रविवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील झेड पी विश्राम गृह येथे पीआरपीचां तालुका निर्धार कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जळगांव जिल्हा अध्यक्ष जगन भाई सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका स्तरीय कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा शहरातील झेड पी विश्राम गृह येथे आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी तालुका अध्यक्ष सुभाष आगळे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना भावी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले.सदर मेळाव्यास तांत्रिक अडचणी मुळे जिल्हा अध्यक्ष जगन भाई सोनवणे यांनी भ्रमणध्वनी द्वारे संवाद साधत सांगितले की, रावेर व जळगांव मधील आंबेडकरी मतदान जास्त असल्याने सदर जागा युतीने पिआरपीला सोडाव्यात.अन्यथा आंबेडकरी जनता बिजेपी शिवसेनेला मतदान करणार नाही,असा घरचा आहेर दिला.सदर मेळाव्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भुसावळ ची जागा जगन भाई सोनवणे यांना द्यावी, असा ठराव एकमुखाने घेण्यात आला.याप्रसंगी तालुका अध्यक्ष सुभाष आगळे,प्रभाकर पानपाटील,भिका आप्पा धनगर,गणेश बाविस्कर, पी.के.शिरसागर,विजू बाबा पाटील, व्हीं एन पाटील,सोपान कोळी आदी कार्यकर्त्या सह अनेक समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments