( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:-अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / रिसोड ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:०३ मार्च रविवार:- वाशिम जिल्ह्य़ातील रिसोड तालुक्यातील केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पल्स पोलिओ लसीकरण राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत दिनांक ३मार्च २०२४ ला रिसोड तालुक्यातील बूथ क्रमांक ५ वर विस्तार अधिकारी मदन नायक यांचे हस्ते लसीकरणात सुरुवात करण्यात आली, यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायणराव आरु, गजानन शर्मा, ज्ञानबा गुरुजी, सुदर्शन आरू, बूथ प्रमुख अंगणवाडी सेविका शीला सावळकर या बुथ क्रमांकावर सर्व बालकांसाठी पल्स पोलिओ चे डोळे देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले.करीता सर्वांनी आपल्या पाल्यांना पल्स पोलिओ देण्यात यावा याबाबत यावेळी आव्हान करण्यात आले.आजच्या लसीकरणातून सुटलेली बालके यांच्याकरिता लसीकरणाचा दुसरा टप्पा घरपोच दिनांक चार मार्च ते सहा मार्च दरम्यान आयोजित केला आहे.


