( वाशिम जिल्हा प्रतिनिधी : - अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव (लोकतक न्युज प्रतिनिधी) दि:०३ माचॅ रविवार:- वाशिम जिल्ह्य़ातील मालेगाव येथील राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमे अंतर्गत तीन मार्च रोजी स्थानिक आरोग्य वर्धीनी मंदिरांत दुपारी दोन वाजेपर्यंत एकसे तीस बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आले.सकाळी नऊ वाजता पासून मातांनी आपल्या बाळाला पोलिओ डोस पाजण्यासाठी रांगा लावल्या होत्या. वैद्यकीय अधिकारी डॉ, मनिष बोरकर यांच्या मार्गदर्शनात आरोग्या विभागाने केलेल्या प्रचारामुळे जनतेत जागृती निर्माण झाली आहे. येथील केन्द्रात पोलिओ डोस पाजण्यासाठी सौ.नम्रता खवले मॅडम, हर्षा ठाकरे, अंगणवाडी सेविका वैशाली मोहळे यांनी यांनी परिश्रम घेतले.

