⭕ *पांगरा बंदी रस्त्यावरच्या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी...*⭕


  ( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:- अजय गायकवाड )

            [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ] 

⭕  वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:-०३ माचॅ रविवार:- वाशिम जिल्ह्य़ातील मालेगाव येथील मालेगाव ते पांगरा बंदी रस्त्यावरच्या नवीन धरनाच्या लघु सिंचन विभागाच्या पुलाची दुरुस्ती करून उंची वाढवा अशी मागणी पांगरा बंदी येथील दिलीप खंडारे, सुनील दत्तराव, गोपाल मुंडे,व बाबाराव मुंडे यांनी लघु पाटबंधारे विभाग यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या पुलावर जागोजागी खड्डे पडले आहेत.तसेच पुलाला चिरा पडल्या आहेत.हा पुल कधीही कोसळणारा आहे.जीवीत हाणी होउ नये म्हणून दहा ते पंधरा दिवसांच्या आत हे काम पूर्ण करा.जर लवकरात लवकर काम सुरू केले नाही तर,आम्ही सर्व  उपोषणाला बसणार आहेत.

Post a Comment

0 Comments