( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:-अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:०५ माचॅ मंगळवार:- वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वाशिम रिसोड राज्यमार्ग ५१ या रस्त्यावर असलेले रिठद गावचे रहिवासी यांच्या येवती फाटा जवळ असलेली घरे व गोठे यामध्ये दरवर्षी पावसाळ्यात नैसर्गिक पाणी घरामध्ये जाते व त्याचा फटका त्यांच्या शेतातील पिकांनाही बसतो सतत दहा वर्षे झाली अतिवृष्टीचा व अति पावसाचा फटका या शेतकऱ्यांना व रहिवाशांना नेहमीच बसत असतो त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होते गुरांसाठी असलेल्या चाऱ्यांचेही नुकसान होते व घरात असलेल्या सामानाचेही नुकसान होत असते याबाबतच्या तक्रारी दोन-तीन वर्षांपूर्वी पासून शेतकरी व रहिवाशी सार्वजनिक बांधकाम उपविभाग रिसोड यांच्याकडे वारंवार करत होते. त्याच तक्रारीची दखल सार्वजनिक बांधकाम उपविभाग रिसोड यांनी घेत याबाबतचे नियोजन केले व रिठद येथील येवती फाट्यावर दोन्ही बाजूला जवळपास सातशे मीटरची सिमेंट नाली बांधकाम होणार आहे व तसे कामही सुरू झाले. याबाबतच्या तक्रारी शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायणराव आरू यांच्या माध्यमातून वसंता आरु साहेब ,आत्माराम आरू पाटील, श्रीराम आरु साहेब ,गजानन शर्मा, भुजंगराव सरनाईक, नरेशराव सरनाईक, मदनराव नायक,कैलास आरू, उद्धव आरु, विजय आरु, इत्यादी शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व उपविभाग रिसोड कडे रस्त्याच्या कडेला सिमेंटच्या नाल्या होण्यासाठी वारंवार निवेदन दिली होती. त्याची फलश्रुती आता कामामध्ये रूपांतरीत झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्याचे शेतकरी प्रदीप आरु यांच्या बोलण्यातून लक्षात येते.या कामाला आज प्रत्यक्षात सुरू करण्यात आले आहे.


