( यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:बळवंत मनवर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ यवतमाळ / पुसद ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:१२ माचॅ मंगळवार :- यवतमाळ जिल्ह्य़ातील पुसद येथील सर्व तंत्रज्ञानात प्रगत असलेल्या राष्ट्रांनी ईव्हीएम चा अनुभव घेऊन लाथाडले आहे तरीपण भारत देशातील निवडणूक आयोगाचा अट्टाहास काॽ उमेदवाराचं स्वतःचं मत देखील पडत नसेल तर मग ईव्हीएम चा वापर मतदारांनी का करू द्यायचा ॽसर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या निवडणुका जर बॅलेट पेपरवर होत असतील तर मग आमच्यावर अन्याय का निवडणूक प्रक्रिया जलद गतीने व पारदर्शिकपणाने व्हावी यासाठी ईव्हीएम या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला तर मग सार्वत्रिक निवडणुका ह्या आठ आठ टप्प्यांमध्ये का घ्याव्या लागतात असा ज्वलंत प्रश्न घेऊन संविधान वाचवा देश वाचवा ही जनजागृती रॅली संपूर्ण महाराष्ट्रभर जनमानसात जाऊन व महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रातील संपूर्ण 36 जिल्ह्यातही ही रॅली जात आहे राजकारण आणि जात धर्माच्या पलीकडे जाऊन मतदार राजांनी संविधानातून जबाबदारीने जागृत व्हावा हाच उद्देश ठेवून या जनजागृती रॅलीचे आयोजन असल्याचे प्रतिपादन संयोजक संविधान विश्लेषक अनंत भवरे औरंगाबाद यांनी केले आहे आज वाशिम शहरातील पंचशील नगर भागामध्ये संविधान मित्र मंडळाच्या वतीने या रॅलीचे भव्य असे स्वागत करण्यात आले व जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अनंत भवरे यांनी वरील रॅलीचा उद्देश प्रगट केला या रॅलीमध्ये चंद्रमणी गाडेकर जालना, सदाशिव हिवाळे बुलढाणा आदी सहभागी झाले आहेत या रॅलीची सुरुवात महाड क्रांतिभूमी चवदार तळे व मनुस्मृति दहन स्तंभाला वंदन करून सुरुवात झालेली आहे ही रॅली संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन नागपूर दीक्षाभूमी ते नाशिक क्रांती भूमी आणि मुंबई दादर चैत्यभूमी ते मंत्रालय असा संपूर्ण महाराष्ट्राचा चांदा ते बांदा संविधान जागृती अभियानाचा दौरा असून आज दिनांक 11 मार्च रोजी वाशिम शहरात आगमन झालेले आहे यावेळी संविधानाप्रती बांधिलकी व आस्था असणाऱ्या विविध सामाजिक संस्था संघटनाचे व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये समनक जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजानन धामणे उपाध्यक्ष अजय सोनुलकर प्राध्यापक गोकुळ आडे,प्राध्यापक विष्णू राठोड संविधान मित्र मंडळाचे सुनील कांबळे ,गजानन कदम, दीपक डोंगरदिवे, सुरज खडसे, मारुती कांबळे, उत्तम कांबळे, शंतनु इंगोले, आलोक कदम, कुमारी प्रिया वाघमारे तसेच डेमोक्रॅटिक पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष इंगळे व अखिल भारतीय मातंग संघाचे राज्य कार्याध्यक्ष संजय वैरागडे दलित पॅंथरचे राज्य पदाधिकारी भाई जगदीश इंगळे, सामाजिक कार्यकर्ते आत्माराम सुतार, संजय बाजड,आर.के.पाटोळे सह पंचशील नगर मधील सर्व जाती धर्मांचे महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक पी एस खंदारे यांनी केले तर आभार सुनील कांबळे यांनी केले.

