( अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत एस ठाकूर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:१२ माचॅ मंगळवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना गुरुवार (दि. १२ मार्च ) पासून सुरुवात होत आहे. या महिन्यात सकाळी सूर्योदयाअगोदर व सूर्यास्तानंतर मशिदीत नमाजपठण करण्यासाठी मुले व वयोवृद्ध व्यक्ती मशिदीत जात असतात. मात्र, शहरातील अनेक मुस्लिमबहुल भागातील पथदिवे बंद आहेत तसेच रस्त्याच्या कडेला घाण पडलेली असते. यामुळे रोजेदारांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे मुस्लिमबहुल भागातील सर्व पथदिवे सुरू करण्यात येऊन या महिन्यात दररोज साफसफाई व औषध फवारणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष नविद शेख,शारुक पठाण, नईम पठान, तौसिफ शेख, आमिर खान , रिझवान पठान यांची स्वाक्षरी आहे.
