( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:-अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२९ फेब्रुवारी गुरुवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे सर्व सोनार समाज बांधव तसेच सराफा व्यावसाईक यांच्यातर्फे दि 27 फेब्रुवारी रोजी श्री संत नरहरी सोनार यांना अभिवादन करण्यात आले.सोनार समाजाचे आराध्य दैवत श्री संत नरहरी सोनार यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार दी 22 फेब्रूवारी रोजी शहरात सर्व सोनार समाज बांधवा तर्फे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन श्री संत नरहरी महाराज मंदिर येथे करण्यात आले होते सकाळी 9 वाजता शहारातुन भव्य शोभायात्रा गावातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली त्यामध्ये सोनार समाजातील सर्व बांधव आणि भगिनी यांनी सहभाग घेतला होता, शिस्तबद्धरित्या ही मिरवणूक टाळ मृदंगाच्या गजरात वाचत गाजत मंदिरापर्यंत नेण्यात आली संध्याकाळी पूजन आरती आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश अर्धापुरकर हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून सोनार समाजाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाढणकर , महिला अध्यक्ष अरूनाताई भांडेकर यांच्या सह समाजातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नरहरी सोनार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रास्ताविक अमोल कल्याणकर यांनी केले त्यामध्ये त्यांनी आपल्या प्रत्येकावर समाजऋण आहे ते फेडण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक कार्यात सहकार्य केले पाहिजे .असे सांगून मंदिराच्या कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली. सर्व मान्यवरांच्या हस्ते सामूहिक महाआरती घेण्यात आली त्यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला महिला आरोग्य तपासणी डॉ सौ पूजा भांडेकर यांनी केली त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले संचलन कुमुद अष्टोनकर यांनी केले आभार प्रदर्शन ईश्वरी गौरकर हिने केले. कार्यक्रमाला समाजातील अनेक पुरुष तसेच महिला भगिनी उपस्तीथ होत्या.कार्यक्रम यशस्वी करण्या साठी सोनार समाजातील युवकांनी प्रयत्न केले. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
