⭕ *चमत्कार सादरीकरणाने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा..!!*⭕

 



                                          

    ( यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:बळवंत मनवर ) 

            [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]            

⭕  यवतमाळ / पुसद  ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२९ फेब्रुवारी गुरुवार:- यवतमाळ जिल्ह्य़ातील पुसद येथील  *"नाते आमचे विचाराचे  आम्ही वारस विवेकाचे *आम्ही वारस ज्ञानाचे ,आम्ही वारस विज्ञानाचे* विवेकाचा आवाज बुलंद करुया या शालेय विद्यार्थ्यांचा जयघोषात तल्लीन झाले विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुगुळ पिंपरी च्या प्रांगणामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला .यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांचे सहप्रयोग उद्बोधन करण्यात आले,सदरील कार्यक्रमासाठी विचार मंचावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाशिम शहर शाखेचे कार्याध्यक्ष श्री पी एस खंदारे , शिवश्री सुभाष पोळकर ,शिवश्री विजयराव शिंदे, श्री किशोर हनवते ,श्री भाऊ शिंदे, श्री दत्ता लहाने ,श्री उद्धवराव रणबावळे ,इत्यादी उपस्थित होते   महान वैज्ञानिक भौतिक शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करून व बगरवातिचा बिना राॅकेलचा दिवा पाण्यावर पेटवून वैज्ञानिक दृष्टया उद्घायटन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, पारदर्शी पदार्थांमधून जाणाऱ्या प्रकाशाचा किरणात बदल करणारा हा बदल डॉ.रमण यांनी शोधून काढला, त्यामुळे त्यांना 1930 मध्ये भौतिक मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय नव्हते तर ,आशियातील पहिले व्यक्ती होते.हा शोध लावल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ 1986 पासून देशभरात या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.विज्ञानामुळे आपल्या जीवनात अनेक बदल झालेले आहेत, विज्ञान दिनाचे विशेष महत्त्व म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विज्ञान आहे हे सगळ्यांच्या लक्षात आले पाहिजे. विज्ञानामुळे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे अंधश्रद्धा नष्ट होत चालले आहेत विज्ञानामुळे रुढीपरंपरेमध्ये बदल झालेले आहेत ,विज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे आणि नवनवीन प्रयोग व शोध लागल्याने मानव प्रजातीच नाही तर संपूर्ण सजीव सृष्टीला संपूर्ण जगाला फायदा झालेला आहे व विज्ञानामुळे मानवी जीवन सुखी झालेले आहे .आजच्या कार्यक्रमांमध्ये पी.एस.खंदारे यांनी चमत्कार  सादरीकरण करून वेगवेगळे प्रयोग करून दाखविले व त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितला .आज समाजामध्ये वेगवेगळे बुवा बापू महाराज लोकांना कसे फसवतात, हे उदाहरणासह स्पष्ट करून सांगितले ,त्याचबरोबर ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यात आले त्या सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके भेट देण्यात आली व वैज्ञानिक गीतांचे सादरीकरण करण्यात आले.*शिवश्री विजयराव शिंदे* यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करायचा असेल तर, आळस ,अज्ञान व अंधश्रद्धा यांना संपवावे लागेल व विज्ञानाची कास धरून विज्ञानामधील कार्यकारण भाव समजून घ्यावा लागेल ,आजच्या काळात अशिक्षित लोकांपेक्षा शिक्षित लोकांमध्ये अंधश्रद्धेच प्रमाण प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे.शिकलेली लोक जर अंधश्रद्धा जोपासत असतील तर अशिक्षितांचे काय? असा प्रश्न त्यांनी केला .

   *नाते आमची विचाराचे आम्ही वारस विवेकाचे*

     * *लिंबू मिरची फोडा अंधश्रद्धा सोडा* 

अंधश्रद्धा घालवण्यासाठी महाराष्ट्रातील संतांनी फार मोठे प्रबोधनाचे कार्य केलेआहे .संत तुकाराम महाराज म्हणतात *नवसे कन्या पुत्र होती मग का करणे लागे पती*गाडगे महाराज सांगतात *देव देवळात नसून तो माणसाच्या हृदयात आहे* म्हणून माणसांमध्ये देव शोधा *तिथेऀ धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी* असा महान उपदेश त्यांनी दिलेला आहे .अनेक धंदेवाईकांनी लोकांमध्ये भीती घातली आहे .धर्ममार्तंडांनी आपला धंदा जोरात चालण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भीती लोकांमध्ये घातलेले आहेत .आणि त्यावर त्यांचे अंधश्रद्धेचे दुकान सुरू आहे.जोपर्यंत या देशातील अंधश्रद्धा दूर होणार नाही तोपर्यंत हा देश महासत्ता बनणार नाही .म्हणून सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा व तसे आचरण करावे असे प्रतिपादन केले ,सदरील कार्यक्रमासाठी  विद्यार्थ्यांची उपस्थिती प्रचंड प्रमाणात होती .महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची संतांच्या विचारांचे अनेक बॅनर, पोस्टर्स यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं . शेवटी चळवळीच्या गीताने समारोप करण्यात आला.

Post a Comment

0 Comments