⭕ *अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमीष दाखवून, बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता...*⭕

 



                  


 

       ( यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:बळवंत मनवर )  

              [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]   

⭕ यवतमाळ / पुसद  ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२४ फेब्रुवारी शनिवार:- यवतमाळ जिल्ह्य़ातील पुसद येथील गुन्हयातील थोडक्यात हकीकत अशी की, यातील फिर्यादी हिने दिलेल्या तक्रारीवरून, आरोपी प्रविण विठ्ठल काळे रा. नागरवाडी, ता. महागांव,जि.यवतमाळ याचे विरूध्द कलम *३६३, ३६६, ३७६, ४१७, ५०४, ५०६* अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. यातील अल्पवयीन फिर्यादी वय अं.१७ वर्षे हिने आरोपी प्रविण विठ्ठल काळे विरूध्द आरोप केला होता की, दिनांक  ०१.०१. २०११ रोजी सकाळी ९ वाजंता ती नागरवाडी वरून दारव्हा येथे जाण्याकरिता बसस्थानकावर आली. त्या ठिकाणी तिला आरोपी प्रविण भेटला व माहुर येथे जाउ असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी ही आरोपी सोबत माहुर येथे गेली. माहुर येथे आरोपी तिला लॉज वर घेवून गेला व तेथे तिचेसोबत लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. त्यानंतर दिनांक ०२.०८.२०११ रोजी आरोपी प्रविण फिर्यादी हिस भेटण्याकरिता वर्धा येथे गेला. त्यावेळी फिर्यादी हिने आरोपीस लग्नाबाबत विचारपूस केली असता, त्याने लग्नास नकार देवून, जिवे मारण्याची धमकी दिली. सदरची घटना फिर्यादी हिने तिच्या वडिलांना सांगितली व त्यानंतर आरोपी विरूध्द महागांव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला व आरोपीस अटक करण्यात आली. आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द करण्यासाठी सरकारी पक्षाने एकूण ६ साक्षदार तपासले. सदर प्रकरणात आरोपीचे वतीने युवा विधीज्ञ अॅड. आदित्य माने (पाटील) यांनी युक्तिवाद केला की, आरोपी प्रविण हा भगवती विद्यालय देवसरी याठिकाणी सहायक शिक्षक पदावर कार्यरत होता व सदर घटनेचे दिवशी दिनांक ०१.०१.२०११ रोजी आरोपी हा देवसरी येथे याच्या कर्तव्यावर हजर होता. ही बाब सिध्द करण्याकरिता आरोपीचे वतीने २ साक्षदार तपासण्यात आले. तसेच सरकारी पक्ष हे फिर्यादीचे वय अल्पवयीन असल्याचे सिध्द करू शकले नाही असा युक्तिवाद केला आरोपीचे वकीलांनी केलेला युक्तिवाद ग्राहय धरून वि. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश पुसद श्रीमान मखरे मॅडम यांनी सदर सर्व गुन्हयात आरोपीची निर्दोष मुक्तता केली. सदर प्रकरणात आरोपीचे वतीने युवा विधीज्ञ अॅड. आदित्य माने (पाटील)यांनी प्रभावीपणे बाजु मांडली.

Post a Comment

0 Comments