⭕ *रिसोड तालुक्यातील नवनियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सत्कार व उपनेते सुषमाताई अंधारे यांच्या संवाद यात्रेनिमित्त नियोजन बैठक...*⭕

 




( वाशिम जिल्हा प्रतिनिधी : अजय गायकवाड )

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ] 

⭕ वाशिम  / रिसोड  ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:३० जानेवारी मंगळवार :- वाशिम जिल्ह्यातील      रिसोड तालुक्यातील नवनियुक्त शिवसेना पदाधिकारी यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले असून यांचा सत्कार विश्वा लाॅन रिसोड येथे करण्यात आला. ह्या नियुक्त्या स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि पश्चिम विदर्भ नेते तथा खासदार अरविंद सावंत आणि जिल्हा संपर्क नेते दिलीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा प्रमुख शिवसेना डॉक्टर सुधिर कव्हर यांनी नियुक्त्या जाहीर केल्या.यावेळी बाळासाहेब देशमुख,सहसंपर्कप्रमुख विश्वनाथ सानप, उपजिल्हाप्रमुख डॉक्टर चंद्रशेखर देशमुख, तालुका प्रमुख नारायण आरु, तालुका समन्वयक घनश्याम मापारी, तालुका संघटक आनंद कुलाळ, यांच्या उपस्थितीत नवनियुक्त उपतालुका प्रमुख म्हणून गजानन खोडके, प्रकाश चोपडे, डॉक्टर जगन कावरखे, डॉक्टर समाधान काठोळे आणी सर्कल प्रमुख म्हणून शिवाजी सोनुने, कैलास इढोळे ,सुनील नागरे, संजय शिंदे, सुरेश बाजड, लक्ष्मण शिंदे, रामसिंग राठोड, सुनील अल्हाट, गजानन बोडखे इत्यादी नवीन पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या जाहीर झाल्या व सर्वांचा सत्कारही करण्यात आला.यासोबतही दोन फेब्रुवारीला शिवसेना उपनेते सुषमाताई अंधारे व त्यांच्यासोबत संवाद यात्रेनिमित्त येणारे नेते  यानिमित्त नियोजन संदर्भात चर्चा करण्यात आली व चांगल्या प्रकारे स्वागत करण्यात येणार आहे. ही यात्रा लोणी, मोप, मोरगव्हान, चाकोली, भर जहाँगीर ,मांगवाडी, रिसोड व मराठवाड्याकडे प्रस्थान करणार आहे.यावेळी नियोजन संदर्भात माहिती देण्यात आली आहे.व नवीन पदाधिकारी यांना पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी तालुक्यातील शिवसेनेचे इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments