⭕ *ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन करण्यात आले...*⭕

 


    ( अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत ठाकूर )

           [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ] 

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:३० जानेवारी मंगळवार:- जळगाव जिल्ह्यातील      अमळनेर येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी भुषविले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.सतीश पारधी यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.वसंत देसले यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून जीवन कार्यावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी विकसित भारताकडे वाटचाल करीत असताना ग्रामीण भागातील खेडी ओस पडू नये, खेडी स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हावी यासाठी महात्मा गांधीजींनी दिलेला मोलाचा संदेश खेड्याकडे चला या विचारांची रुजवून होण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. व्हि.डि.पाटील यांनी आपल्या मनोगतून महात्मा गांधीजींच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. सत्य ,अहिंसा, प्रामाणिकपणा हि जीवनमूल्ये विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेपासूनच आत्मसात करावे असा मोलाचा संदेश त्यांनी आपले मनोगतातून व्यक्त केला. अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.सतीश पारधी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्त्व महात्मा गांधी यांच्या विचारांच्या आधारावर स्पष्ट केले. कु. नाजमीन पठाण विद्यार्थिनीने स्वातंत्र्य चळवळीतील महात्मा गांधी यांचे योगदान या विषयावर आपले मत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.माधव वाघमारे यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ. दिलीप कदम प्रा. डॉ.पवन पाटील, प्रा. डॉ .संजय पाटील , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments