( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि: २७ जानेवारी शनिवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील मराठा आरक्षणाची चळवळ आज मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी निर्णायक लढा देऊन मराठा आरक्षणाला मोठं यश प्राप्त करून दिलं आहे. तर या घवघवीत विजयाचा जल्लोष आज सकल मराठा समाजा कडून मालेगाव शहरात चौकात चौकात फटाके फोडत पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला आहे.तसेच जल्लोष करतांना विक्की पाटील सदार, अजय अंभोरे,आकाश ठाकरे,नागेश गायकवाड, विशाल सदार, वैभव बोरचाटे, अनिल शिंदे, मंगेश गायकवाड, शेकडो मराठा बांधव उपस्तित होते.

