( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:-अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:३१ जानेवारी बुधवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य कमिटी द्वारे मालेगाव तालुक्याची शहर कार्यकारिणी दि. २४ जानेवारी रोजी घोषित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांवर होणारे हल्ले रॅगिंग तसेच आणखी विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील सम्यक विद्यार्थी आदालन त्याला वाचा फोडण्यासाठी मालेगाव तालुक्यात वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनेची शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. डॉ. अरुण सावंत उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी तथा सदस्य, सल्लागार समिती महाराष्ट्र राज्य व महेश भारतीय सदस्य, सल्लागार समिती सम्यक विद्यार्थी आंदोलन, सम्यक विद्यार्थी आंदोलन वाशिम जिल्हाध्यक्ष सिंहल पठाडे, मालेगांव तालुकाध्यक्ष सुवर्णजित ढाले, मालेगांव प्रसिद्धी प्रमुख सुरज अवचार, संघटक प्रविण अवचार यांच्या आदेशानुसार सम्यक विद्यार्थी आंदोलन मालेगांव शहरध्यक्ष या पदावर राजदिप पखाले यांची नियुक्ती करण्यात आली तर महासचिव पदावर रोहित रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली. सम्यक विद्यार्थी आंदोलन हे संघटन विद्यार्थांच्या न्याय हक्क अधिकारासाठी लढणारी संघटना आहे. मालेगांव तालुक्यातील उर्वरित शहर कार्यकारणी तालुका उपाध्यक्ष मंगेश गायकवाड, अभिषेक वैद्य, सचिव नितीन पखाले, सहसचिव रोहन पखाले,संघटक आदित्य गायकवाड, सहसंघटक रोहन इंगळे, सोशल मीडिया प्रमुख युवराज गायकवाड, सुजित पखाले, प्रसिद्धी प्रमुख प्रथमेश गायकवाड, काँलेज प्रतिनिधी योगेश गायकवाड, सचिन इंगळे, सुरज इंगोले, सदस्य अनंता इंगळे, प्रेम ढाले, या सर्व तालुका शहर कार्यकारणीतील पदाधिकाऱ्याकडे विद्यार्थांच्या लढ्याची व विद्यार्थी संघटनेची जबाबदारी सोपविल्या गेली आहे.




