(वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधि ) दि:०१ जानेवारी सोमवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात कुत्र्याची संख्या अधिच जास्त आहे.त्यात मागच्या महिन्यापासुन शेकडो कुत्रे शहरात भटकताना दिसत आहेत.यात अनेक अनोळखी, मोकाट कुत्रे रात्रंदिवस गल्ली बोळात व मुख्य रस्त्यावर भटकताना दिसत असल्याने हे कुत्रे बाहेर गावाहून येथे आणुन सोडले असे लोकांतून बोलले जात आहे.काहीही करा पण या मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करा. अशी मागणी महिला व शालेय मुलांच्या पालकांनी केली आहे. शहरात अनेक अनोळखी, वेगवेगळ्या रंगांची, काही मोठ्या आकाराचे तर काही रोगिष्ट कुत्रे,जोरजोरात भूंकत आडवे तिडवे पळतात.शहरात अचानक एव्हढ्या मोठ्या संख्येने हे कुत्रे गावात कोठून आले आहेत?असा प्रश्न लोकांतून उपस्थित केला जात आहे.हे कुत्रे शहरातून रात्रीच्या वेळी हे कुत्रे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने आणून सोडले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.तेव्हा नगरपंचायतने या कुत्र्याचा बंदोबस्त करावा. अशी मागणी शहरातील महिला सह वाहन चालकातुन केली आहे.विशेष म्हणजे हे कुत्रे पंधरा ते कधी कधी, वीस , पंचवीस टोळक्याने एकत्र दिसत आहेत. एव्हडे कुत्रे एकत्र फिरताना आतापर्यंत कधी बघितले नाही असे लोक बोलत आहेत. अनेक वाहनचालक कुत्रा आड आल्यानं खाली पडून जखमी झाल्याचे सुद्धा बोलले जाते.या कुत्र्याला भूक लागली की,ते केव्हाही कुणाच्याही घरात घुसतात आणि दिसेल ती वस्तू घेऊन पळतात.लहान मुलाच्या हातातील वस्तू सुद्धा घेऊन जातात. एखाद्या दिवशी लहान मुलांचा जीव जाण्याची शक्यता वाढली आहे.आहे तेव्हा नगरपंचायतने हे कुत्रे पकडून त्यांना इतर ठिकाणी सोडून देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी महिला करीत आहेत शाळेत जाणारी लहान मुले कुत्र्याला घाबरून शाळेत जाण्याचे टाळत आहेत.तेव्हा काही दिवस सकाळी शाळा भरताना व सुटल्यावर नगरपंचायतने शालेय रस्त्यावर एखाद्या कर्मचाऱ्यांची ड्युटी लावावी अशी मागणी सुद्धा पालकांनी केली आहे.
