( रिसोड तालुका प्रतिनिधी :-अमर रासकर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / रिसोड ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२९ डिसेंबर शुक्रवार:- वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील रिसोड भारतीय बौद्ध महासभेच्या रिसोड शाखेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भारतीय बौद्ध महासभा व सुभेदार रामजी बाबा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने संबोधी बुद्ध विहार एकता नगर रिसोड येथे . दि . १ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता महार रेजिमेंट चे माजी सैनिक , समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी , सर्व नागरिकांच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाच्या प्रतिकृतीला मानवंदना देण्यात येणार आहे . कार्यक्रमाचा उद्देश हाच की जाणा प्रत्यक्ष भीमा कोरेगाव येथे जाऊ शकत नाहीत . पण आपल्या पुर्वजाचा शौर्याचा इतिहास माहिती व्हावा या करिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व सुभेदार रामजी बाबा ट्रस्टचे सर्व सदस्य झटत आहेत . ज्यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची रुपरेषा राहुल जुमडे यांनी . तर अभिवादन कार्यक्रमासाठी सर्व उपासक उपासिका , भारतीय बौद्ध महासभेचे , समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष शालिग्राम पठाडे व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केला यांनी केले आहे ....
*प्रतिक्रिया*
फुले,शाहू,आंबेडकरी विचारधारा चळवळीतील नागरिकांना भीमा कोरेगाव येथे जाणे शक्य नाही होत त्यांनी रिसोड येथील एकता नगर संबोधी बुद्ध विहार येथे १ जानेवारीला येऊन भीमा कोरेगाव शौर्य विजय स्तंभाच्याला अभिवादन करण्या करता यावे
*राहुल जुमडे*
*भारतीय बौद्ध महासभा शहर अध्यक्ष*
