( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / रिसोड ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२६ डिसेंबर मंगळवार- : वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील रिसोड पासून हाकेच्या अंतरावरील कंकरवाडी गोरखनाथ महाराज संस्थान, टेकडी येथे गोरखनाथ मंदिर व्यवस्थापन, भक्त मंडळांच्या वतीने श्री गुरूचरित्र पारायणासह विविध धार्मिक उपक्रम कालपर्यंत सुरू होते. आज मंगळवारला चैतन्य श्री गुरुदत्त दत्त जयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पहाटे पाच वाजे पासुन विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे .यात श्री गोरखनाथ पूजा, दत्त जन्मोत्सव, महाप्रसाद, हरीपाठ, महाआरती, भजन आदी विधिवत पूजाविधी व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यानंतर दुपारी १२ ते ६ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोहळ यशस्वी करण्यासाठी सर्व गुरु सेवकांनी विशेष परिश्रम घेत असून भगवान दादा सितारामजी क्षीरसागर (अध्यक्ष) यांच्यासह संस्थांचे विश्वस्त मंडळ भाविक भक्तांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहनही क्षिरसागर यांनी केले आहे.
