( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२९ डिसेंबर शुक्रवार:-वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील मालेगांव स्थानिक मालेगाव नगर पंचायतमध्ये दलितेत्तर योजने अंतर्गत 2021 2022 च्या विकास निधी अंतर्गत लाखों रुपयांची कामे सुरू आहेत व काही झाली आहेत परंतू ही सर्व कामे अंदाज पत्रकाला बगल देऊन केली जात असल्याची लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते गजानन काळे यांनी दि.२९ डिसेंबर रोजी नगरपंचायत कार्यकारी अभियंता यांच्याकडे दिली आहे पूर्ण कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे ढेकेदार कम कार्यकर्ते सुद्धा थातुरमातुर कामे करून घेत असल्याचे दिसुन येत आहे काळे यांनी कार्यकारी नगरपंचायत अभियंता यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीत असेही नमूद केले की,शहराच्या वॉर्ड क्र २ मध्ये पेव्हर ब्लॉक रस्त्याचे काम करण्यात आले आहे सदर काम मंजूर अंदाज पत्रकातील तरतुदीनुसार करण्यात आले नाही शासन निर्णय परिपत्रक प्रमाणे गीट्टी वापरण्यापूर्वी दुसऱ्या विभागाचे उपअभियंता यांच्याकडून तपासणी करून घेणे अनिवार्य असताना ती घेण्यात आली नाही सदर खोदकाम अर्धा फूट केले व बांधकामात वापरण्यात आलेली कृतीमं रेतीची क्रॉस तपासणी करण्यात आली नाही व त्या रेतीत मातीचा वापर केला असाही तक्रारीत आरोप केला आहे सदर बांधकामात अंदाज पत्रक प्रमाणे नाही तसेच ह्या कामाचे कोणत्या निधी अंतर्गत काम होत आहे त्याचे फलक सुध्दा लावण्यात आले नाही त्यामुळे सदर काम नियमानुसार केले गेले नाही म्हणून या कामावर चौकशी समिती नेमून संबंधित जबाबदार व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी वॉर्ड क्रमांक २ मधील रहिवासी गजानन काळे व अरविंद सांभापुरे यांनी कार्यकारी अभियंता यांच्या कडे २९ डिसेंबर रोजी लेखी तक्रार देऊन केली आहे सदर बांधकामाच्या चौकशीकडे मालेगांव शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे...बॉक्स मालेगाव शहरातील वार्ड क्रमांक दोन व तेरा मधील अंदाजपत्रकानुसार कुठलीच काम झालेले नसून सदर काम निकृष्ट दर्जाचे व व खोदकाम न करता दीड फूट उंची थर टाकून काम केल्या जात आहेत असा आरोप मालेगाव वाशीयांनी केला जात आहे सदर ठेकेदारावर नगरपंचायत अधिकारी कारवाई करणार का?.. याकडे मालेगाव वाशियांचे लक्ष लागले आहे.




