( वाशिम जिल्हा प्रतिनिधी : अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:३० नोव्हेंबर गुरुवार:- वाशिम जिल्ह्य़ातील मालेगाव येथील अ.भा. मराठी नाट्य परिषद मालेगाव मानोरा शाखेतर्फे सागरा प्राण तळमळला या कार्यक्रमा संदर्भातल्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेचे अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य प्रकाश कापुरे होते सदर सभेमध्ये कार्यक्रमाच्या संदर्भात दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी वि.दा. सावरकर यांच्या जीवनावरील सागरा प्राण तळमळला या तीन अंकी फिरत्या रंगमंचावर परिपूर्ण असलेल्या व छोट्या पडद्यावरील कलावंतांच्या समूहाने सादर केलेले हे नाटक सादर करण्याच्या दृष्टीने रूपरेषा तयार करण्यात आली या कार्यक्रमांतर्गत झालेल्या सभेमध्ये प्रास्ताविक अनिल सोळंके यांनी केले तर आभार प्रदर्शन रवी बाविस्कर यांनी केले त्याचप्रमाणे या सभेमध्ये सदर कार्यक्रमाच्या नियोजनार्थ विविध समित्यांची स्थापना करण्यात आली शासना मार्फत राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमामध्ये गावकऱ्यांनी पुण्या मुंबईच्या धरतीवर दाखवण्यात येत असलेल्या या विशेष नाटकाच्या प्रयोगाचा प्रेक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. या सभेला प्रकाश कापुरे, रवी बाविस्कर, अनिल सोळंके, किरण जिरवणकर, राजीव राऊत, राजु बेलोकार, सुभाष बळी, गणेश खरात, गणेश जायभाये, विश्णू घोळवे, रमेश बळी, सागर भांगदिया, सुहास लाव्हरे, नंदकिशोर वनस्कर, बालाभाऊ कुटे, सौ.आरती वनस्कर यांची विशेष उपस्थिती होती हा कार्यक्रम विनाशुल्क असुन याच्या पासेस आयोजकांकडून प्रेक्षकांनी प्राप्त कराव्यात.
