⭕ *मालेगांवात बाप्पांना भक्तीभावपूर्ण निरोप...पावसातही गणेश भक्तांचा उत्सव शिगेला...*⭕

 



(वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड)

      [लोकतक समाचार न्युज नेटवर्क]

⭕ वाशिम/मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:०१ ऑक्टोबर रविवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव दि २९ सप्टेंबर मालेगांव शहरातील लाडक्या गणपती बाप्पांना ढोलताशाच्या , मंगलवाद्याच्या  गजरात डिजेच्या तालावर थिरकत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा गगनभेदी गजरात शहरातील गणेश भक्तांनी २९ सप्टेंबर रोजी मिरवणूकीने निरोप दिला दुपारी १२ वाजतापासूनच आपआपल्या मंडळातील श्रींची मुर्ती सजविलेल्या ट्रॅक्टरवर ठेवून गुलालाची उधळण करून शहरातील दरवर्षीच्या पंरपरेनुसार गांधी चौक येथील श्री हनुमान मंदिराजवळ  महात्मा फुले गणेश मंडळ ,  जय भवानी गणेश मंडळ , हिंदु युवा गणेश मंडळ ,  जनता गणेश मंडळ , नवरंग गणेश उत्सव मंडळ , कोथळेश्वर गणेश मंडळ , रुद्रा अवतार व्यायाम शाळा गणेश मंडळ , श्री कृष्ण गणेश मंडळ , विर भगत सिंग गणेश मंडळ , युवा क्रांती गणेश मंडळ आणि मालेगांव येथील मिरवणुकी मध्ये एकूण २३ सार्वजनिक मंडळानी सहभाग घेतला होता एक एक गणेश मंडळांनी आपली मंडळे आणली गणेश मंडळांनी बाप्पाचा सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदविला होता यामध्ये शहरातील सावर्जनिक गणेश मंडळाचा भारूडाचा कार्यक्रम या विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी प्रमाणेच सर्वात पुढे होता या मंडळांची एका शतकाची परंपरा आजही कायम जोपासून असल्याचे सांगण्यात येते  मिरवणुकीत विघ्नहर्ता गणेश मंडळांची कौतुकास्पद कामगिरी वाशिम जिल्हात प्रथमच महाबली बजरंग बली व देवो के देव महादेव अघोरी तांडव आणि शिवराज गणेश मंडळांनी महाबली बजरंग बली यांचा देखावा करण्यात आले या दोन्ही  नृत्याचे सादरीकरण केले देखाव्याला पाहण्यासाठी शहरवासी पंचक्रोशीतील व जिल्हाबाहेरून लोकाची  गणेशभक्तांची प्रचंड गर्दी जमली होती प्रंचड उत्साहात दुपारी पावसाने हजेरी लावली होती गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गगनभेदी गजरात मिरवणुक शहरातील प्रमुख मार्गावरून शांततेत उत्साहात सुरु होती मिरवणुकी दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments