⭕ *उत्सव भुलाबाईचा..लोक संस्कृतीमध्ये भुलाबाई उत्सवाला मोठे महत्व आहे !...*⭕

( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड )

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ] 

⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२९ ऑक्टोबर रविवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगांव :- भुलाबाई म्हणजे पार्वती,जगत्माता अदीपराशक्ति,भूमि सारखी सर्जनशील म्हणून ती माता भुवनेश्वरी,या भूमीच्या सर्जनशीलतेचा खेळोत्सव म्हणजे भुलाबाई एक महिन्यासाठी ती आपल्या माहेरी येते तिचा हा सण भुलाबाई सोबत भुलोजी आणि गणेश यांची महिनाभर लहान मुली घरोघरी स्थापना करतात भुलाबाई हा उत्सव विदर्भात पारंपारिक बाल महोत्सव म्हणूनही ख्याती प्राप्त आहे माळी पौर्णिमेपर्यंत (कोजागिरी पौर्णिमा)...शेतामध्ये ज्वारी,उडीद,मूग,सोयाबीन ही पिके काढणीला आलेली असतात या नव्या धान्याचं स्वागत म्हणजे भुलाबाईचा उत्सव भुलाबाई आणि भुलोबा साठी ज्वारीच्या भरलेल्या कणसांसह ज्वारीच्या भांड्यांचा निवारा तयार केला जातो त्यामध्ये भुलाबाई आणि भुलोबाला ठेवून पूजा केली जाते या निवाऱ्याला माळी म्हणतात..भोंडला,भुलाबाई संपूर्ण महाराष्ट्राचा हा लोक उत्सव खास नवरात्रीत साजरा केला जातो.विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत महाराष्ट्रातील घरोघरी महिनाभर भोंडल्याचा खेळ मांडला जातो शेजारपाजारच्या मुली सायंकाळी एकत्र येऊन दिवे लावून खऱ्या अर्थाने गाणी म्हणतात अतिशय उत्सव प्रिय आपण मराठी माणसं आहोत पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात हा उत्सव भोंडला म्हणून साजरा करतात तर आपल्या विदर्भात भुलाबाई म्हणून साजरा करतात सर्व मुली एकत्र येऊन भुलाबाईची पारंपारिक गाणी म्हणतात आणि शेवटी भुलाबाईचा जो प्रसाद वाटला जातो त्याला खिरापत म्हणतात भुलाबाईच्या या नैवेद्यामध्ये दररोज नवा खाऊ असतो तो बंद डब्यात झाकून ठेवला जातो.तो खाऊ ओळखण्याची भारी मज्जाच असते.

"भुलाबाई भुलाबाई खाऊच काय,जिंकला नाहीस तर देऊच काय"...अशा प्रकारची खिरापत जिंकण्याची स्पर्धा रंगते शेवटच्या दिवशी म्हणजे कोजागिरीला मुलींना एका महिन्यांचा खाऊ म्हणजे ३१ दिवसांचा खाऊ,खिरापत एकाच दिवशी मिळतो शेवटच्या दिवशी भुलाबाईंना २३ प्रकारच्या खिरापतींचा नैवेद्य दिला जातो त्यामुळे लहान मुलींना, महिलांना आणि सगळ्यांनाच या दिवशी खाऊंची,खिरापतीची मोठी मेजवानी असते भुलाबाईच्या गाण्यांनी हे लोक साहित्य समृद्ध केले आहे हे केवळ मनोरंजन नव्हे तर एकत्र कुटुंब पद्धतीचा गोडवा या गाण्यांमधून जाणवतो,सुनेची सासरी होणारी दमछाक भुलाबाईच्या गाण्यांतून व्यक्त होते,सासरचं सासर पण व माहेरचं माहेर पण या गाण्यातून कळतं परंतु अलीकडच्या काळात भुलाबाई,भोंडला हे उत्सव काळाच्या पडद्याआड जाऊ पाहत आहेत पण आपल्या नव्या पिढीला या पद्धतींची, आपल्या जुन्या संस्कृतींची माहिती होण्यासाठी हे उत्सव साजरे करत राहणे महत्त्वाचे आहे लोक संस्कृतीमध्ये भुलाबाई उत्सवाला मोठे महत्व आहे मात्र बदलत्या काळात भुलाबाईचा उत्सव आणि त्या निमित्ताने होणारी गाणी हळूहळू लोप पावत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आज ही महिलांच्या जीवनाशी निगडित असलेल्या अशा या भुलाबाई महोत्सवाचे महत्व टिकून राहावे या साठी मालेगांव शहरातल्या वार्ड क्रं १२ मधील महिलां व मुली भुलाबाई गाण्याचा उत्सव आजही टिपऱ्यां वाजवुन व गाणे म्हणून जपत आहेत.

Post a Comment

0 Comments