(वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड)
(वाशिम/मालेगाव (लोकतक समाचार न्युजपोटॅल) दि:-२७ ऑगस्ट रविवार:-वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील अनसिंग येथील प. दि. जैन कला व विज्ञान महाविद्यालयात हिंदू धर्माच्या विरोधात उदाहरण देऊन धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी दोषीवर त्वरित कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद वाशिम त्यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात नमूद आहे की. महाविद्यालयात हिंदू धर्माच्या परंपरा चावत अकरावीच्या वर्गात उदाहरण देऊन हिंदू धर्माच्या भावना दुखवणारे शिक्षण देण्यात येत असल्याने समस्त हिंदू धर्माच्या भावना दुखविण्याचे काम या महाद्यालयात होत आहे. स्वरित महाविद्यालयाने समस्त हिंदू धर्माची माफी मागावी अन्यथा ७ दिवसात
महाविद्यालया समोर आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष मनीष डांगे, विद्यार्थी सेनेचे यश चव्हाण, मोहन कोल्हे, मनसे वाशिम शहराध्यक्ष गणेश इंगोले, शहरसंघटक प्रतीक कांबळे, तालुका संघटक रघुनाथ खूपसे, तालुका अध्यक्ष विठ्ठल राठोड तसेच हिंदू धर्माचे काम करणारे गिरधारी गोरे, विनोद दुपाट, अनंता ढोके, ईश्वर शिंदे, बबलू, ठाकूर, रमेश पुरी, शुभम काळे, महेश सारडा, अमोल मोटे उपस्थित होते.


