⭕ *वाशिम:मंगरूळपीरात महिलेच्या पर्समधील पाच हजार रुपये लंपास...* ⭕

(मंगरूळपीर तालुका प्रतिनिधी:अनंता घुगे)

⭕ वाशिम/मंगरूळपीर (लोकतक समाचार) दि:२५ ऑगस्ट शुक्रवार:-वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील बसस्थानकातून एसटी बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या पर्समधील पाच हजार रुपये लंपास केले. याबाबत प्राप्त माहितीनुसार, मंगरूळपीर शहरातील पुंजाजीनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या कल्पना दिनकर जाधव या महिलेने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवून कुण्यातरी अज्ञात इसमाने पाच हजार रुपये ठेवून असलेली पर्स चोरून केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंविचे गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments