⭕ *वाशिम:ग्राम उमरवाडी येथे वित्तीय साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळा...मनीवाइज वित्तीय साक्षरता सेंटर चा उपक्रम...*⭕

 (वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड)

वाशिम/ मालेगाव (लोकतक समाचार) दि:२५ ऑगस्ट शुक्रवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगांव येथील भारतीय रिझर्व्ह बँक , स्टेट बँक ऑफ इंडिया व्दारा  संचालित  क्रिसील,  फाऊंडेशन यांच्या सहकार्याने चालु असलेल्या मनीवाइज वित्तीय साक्षरता सेंटर मालेगांव अंतर्गत,  ग्राम उमरवाडी ता. मालेगांव येथे वित्तीय साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळा चे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रियाताई पाठक उपस्थिती जयानंद अवचार , विनोद जाधव तालुका समन्वयक मनीवाईज सेंटर मालेगांव , सुवर्णा जामकर, मिरा धंदरे, सखु धंदरे व बहुसंख्य महीला व पुरुष यांची उपस्थिती होती, मनीवाईज सेंटर चे ध्येय व उद्देश क्रीसिल फाऊंडेशन ची संकल्पना , प्रधान मंत्री जनधन खाते व त्याचे महत्त्व, ओवर ड्राफ व फायदे प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना ,  प्रधान मंत्री जिवन ज्योती विमा योजना, अटल पेंशन योजना,  वरील सर्व योजना साठी बँक मधे खाते असने अवश्यक आहे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अपघाती अर्ध अपंगत्व एक लाख रुपये पुर्ण अपंगत्व दोन लाख रुपये, व अपघाती निधन झाल्यास दोन लाख रुपये आर्थिक मदत वारसदार यांना मिळते तसेच प्रधान मंत्री जिवन  जोती विमा योजना वार्षिक 436  रु वय मर्यादा 18 ते 50 कुठल्याही प्रकारे मृत्यू झाल्यास आर्थिक मदत दोन लाख रुपये मिळतात, आयुष्यमान भारत योजना, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य विमा योजना, बँक लोकपाल, विमा लोकपाल, पेंशन फंड, डीजीटल व्यवहार , फोन कॉल, मॅसेज यांच्या मधुन होणारी फसवणूक, या संदर्भात मार्गदर्शन  विनोद जाधव यांनी केले , कार्यक्रमाला बहुसंख पुरुष व महिला मंडळी यांची उपस्थित होती सदर कामकाज जिल्हा अग्रणी बँक चे जिल्हा व्यवस्थापक दिलीप मोहपात्रा , नाबार्ड चे व्यवस्थापक शंकर कोकडवार क्रिसिल फाऊंडेशन चे शक्ती भिसे, राजीव बोबडे, देविदास शिंदे , सत्यपाल चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चालु आहे कार्यक्रमाचे संचालन सुवर्णा जामकर  व आभार मिरा धंदरे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments