(वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड)
⭕वाशिम/मालेगाव (प्रतिनिधी:लोकतक समाचार) दि:२२ ऑगस्ट मंगळवार:-वाशिम जिल्ह्यातील मालेगांव येथे दि.२२/८/२३ ला नव्याने रुजू झालेले पंचायत समिती येथील गट विकास अधिकारी कैलास घुगे यांचा सर्व समावेशक सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला यावेळी सत्कारप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना घुगे म्हणाले की माझं मालेगांव तालुक्यावर नेहमीच प्रेम राहिलेल आहे व मी या तालुक्यातील मैराडव्ह येथील रहिवासी देखील आहे तर यापुढे पंचायत समिती अंतर्गत येणारे सर्व कामे चोक पणे करेल त्यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुरेश मुंडे,राजु सांगळे,व शिवसेना ठाकरे गटाचे उपतालुकाध्यक्ष भगवान बोरकर,गजानन बोरचाटे,पत्रकार शिवाजी घुगे,विलास क्षीरसागर,अरुणराव घुगे पंचायत समिती सदस्य,बबनराव घुगे सेवा निवृत लिपिक लघु सिंचन,किशोर पळसकर,डॉ.प्रमोद घुगे,प्रफुल घुगेसदस्य पंचायत समिती,तसेच सभापती पती मधुकर मामा काळे,बाळासाहेब वाघ व इतर सदस्य तालुक्यातील सरपंच व कार्यकर्ते व ग्रामसेवक संघटना पंचायत समिती कर्मचारी वृद्ध मालेगाव तालुक्यातील सरपंच तथा,या सह पंचायत समिती सभापती,सामाजिक कार्यकर्ते आदींनी भेटी देऊन नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी कैलासराव घुगे यांचा पुष्प गुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला मालेगांव पंचायत समितींना नव्याने गटविकास अधिकारी मिळाले आहेत त्यामुळे प्रलंबित असलेल्या कामांना आता वेग मिळेल,असे संकेत आहेत.
