मराठी भाषा आणी मराठी गजल समृद्ध पण लेखन अल्प-:- डॉ.संतोष तांदळे.



(सोयगाव प्रतिनिधी:विजय काळे)

 सोयगाव :- महाराष्ट्रातील सिद्धह स्त, कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी मराठी भाषा गौरव दिना निमित्त प्रा.डॉ.संतोष तांदळे यांचे *'मराठी भाषा आणि मराठी गझल'* या विषयावर  दि.27-02-2023 रोजी आयोजन  करण्यात आले होते. त्यानिमित्त डॉ. संतोष तांदळे  बोलत होते. प्रेमकाव्य हे गझलेचे प्राथमिक स्वरूप होते व ते आजही आहेच! गझल हे हाडामांसाच्या माणसाचे काव्य आहे. यात कवी जे म्हणतो तीच अनुभुती लाखोंना आलेली असू शकते. 'अरे? हे आपणही अनुभवलेले आहे' असे वाटून उत्स्फुर्त दाद देण्यास गझल कारणीभूत ठरू शकते. मानसिक वेदना हा गझलेचा पाया आहे असे दिसते तर त्या वेदनांचा सोहळा साजरा करून चेहरा आनंदी असल्याचे भासवणे हा गझलेचा कळस! अर्थात, या स्वरुपात खूपदा बदलही घडू शकतोच!मराठी गजलेला  माधव ज्यूलीयन ते सुरेश भट असा समृद्ध वारसा लाभलेला 

असतानाही मराठी गजल लेखन  अल्प आहे.कार्यक्रमाचा अधक्षीय समारोप करताना प्र.प्राचार्य डॉ. शिरीष पवार म्हणाले की मराठी भाषा  बोलणाऱ्यांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. मराठी भाषा श्रेष्ठ दर्जाची भाषा असून तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे

प्रास्ताविक डॉ.दिलीप बिरुटे

(प्रमुख,मराठी विभाग) यांनी केले. यावेळी ग्रंथपाल श्रीमती. निर्मला  बोराडे यांनी मराठी ग्रंथ चळवळ याविषयी या विषयावर आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रमेश औताडे यांनी तर आभार डॉ.पांडुरंग डापके यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मराठी पुस्तक परीक्षण संकल्प केला. कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments