(सोयगाव:-प्रतिनिधी विजय काळे)
सोयगाव:-- सोयगाव तालुक्याची शासकीय कार्यालय असलेल्या गजबाजलेल्या सोयगाव- बनोटी रस्त्यावर औरंगाबाद येथील स्थलांतरित झालेले देशी दारू दुकान सुरू होणारे दुकानास शासनाने परवानगी देऊ नये अशी मागणी महिला मंडळाच्या अध्यक्षा विमलबाई खैरनार यांनी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक औरंगाबाद यांना दिले आहे.अन्यथा महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असेही निवेदनात म्हटले आहे.आमखेडा येथे गावाच्या प्रमुख असलेल्या सोयगाव- बनोटी रस्त्यावर तसेच शासकीय कार्यालय असलेल्या तहसील कार्यालय, उप अधीक्षक सिटी सर्व्हे कार्यालय,, वनक्षेत्रपाल कार्यालय, सामाजिक वनीकरण कार्यालय, लघु पाटबंधारे कार्यालय, ग्रामीण रुग्णालय सोयगाव आदी कार्यालय आहेत. या कार्यालयात तालुक्यातील खेडेगावातून लोक आपली कामे घेऊन येतात. त्यामुळे हे वर्दळीचे ठिकाण असल्याने येथे औरंगाबाद स्थित देशी दारूच्या दुकानाचे स्थलांतर होणार आहे. या ठिकाणी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गजानन महाराज,साई मंदिर, व विठ्ठल मंदिरात हजारो भाविक येतात. तसेच शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचीही वर्दळ असते.
हे देशी दारू दुकान सुरू झाल्याने आमखेडा गावातील तरुण वर्ग दारूच्या आहारी जाऊन व्यसनी होतील त्यात अनेकांची घरादारे उध्वस्त होऊन लेकर-बाळ उघड्यावर पडतील.त्यामुळे या दुकानास शासनाने परवानगी देऊ नये अशी मागणी महिला मंडळाच्या विमलबाई खैरनार, कलाबाई धोंडू गायकवाड, यांच्यासह शेकडो महिलांनी केली आहे.या निवेदनावर शेकडो महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रति जिल्हाअधिकारी औरंगाबाद,आयुक्त राज्य उत्पादन शुल्क मुंबई, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद, पोलीस अधीक्षक ग्रामीण औरंगाबाद, तहसीलदार सोयगाव, गटविकास अधिकारी पंचायत समिती सोयगाव व पोलीस स्टेशन सोयगाव यांना देण्यात आल्या आहेत.
कोड :- आमखेडा ग्रामपंचायत कार्यालयाकडे संबंधित दुकानदारांचा ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज प्राप्त झालेला असून अद्याप देण्यात आलेले नाही.
--- सत्यनारायण पुल्लेवाड
ग्रामसेवक आमखेडा
