सोयगाव शहरातील नगर पंचायतीची पाणीपुरवठा योजनेची पाईप लाईन फुटली ; हजारो लिटर पाणी रस्त्यावर,

(सोयगाव प्रतिनिधी:--विजय काळे)


सोयगाव:--सोयगाव शहरातील दयाळनगर प्रभागासाठी पिण्याचा पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन गेल्या पंधरा दिवसापासून फुटली असून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या पाण्यामुळे रस्त्यावर मोठे डबके साचल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. हे घाण पाणी पुन्हा पाईप लाईनद्वारे नागरिकांना नळाद्वारे वितरित होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

प्रभाग क्रमांक १५ दयाळनागर येथे सोयगाव नगर पंचायत विभागाच्या सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या पाईप लाईनद्वारे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. दरम्यान ही पाईपलाईन गेल्या पंधरा दिवसापासून फुटली आहे. पाईप लाईन फुटल्याने पाणी तुबल्याने मोठे डबके साचले आहे.या साचलेल्या पाण्यात दुर्गंधी साचल्याने वराहांचा मुक्त संचार होत आहे. हे दुर्गंधीयुक्त पाणी पाईपलाईन मध्ये जाऊन नागरिकांना नळाद्वारे वितरित होत असल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे.

याची नगर पंचायत प्रशासनाने गंभीरतेने दक्षता घ्यावी व तात्काळ पाईप लाईन दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर कृष्णा गवळी, योगेश गवळी, सिंधुबाई गवळे,ईश्वर सोनवणे,प्रमोद तायडे, अक्षय गवळी, पंढरी इंगळे, आदी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो ओळ :- सोयगाव -शहरातील नगर पंचायतीची पाणीपुरवठा योजनेची पाईप लाईन फुटल्याने तयार झालेले दुर्गंधीयुक्त पाण्याचे डबके

Post a Comment

0 Comments