कन्नड तालुक्द्यायातील डोगरगाव येथील विध्धाथीँनी शिवचरीत्राची सांगड स्वआयुष्यात घातल्यास यश संपादन--मुख्यध्यापक रायभान जाधव यांचे प्रतिपादन

 


(सोयगाव प्रतिनिधी,विजय काळे)

सिल्लोड:- कन्नड तालुक्यातील डोगरगाव येथे घोषणा,मिरवणुक,डॉल्बी याच्यातना शिवचरीत्र्य घेता येणार नाही तर वैचारीक जयंत्या साजऱ्या व्हाव्या. विद्यार्थ्यानी शिवचरित्रातून बोध घेत आयुष्याच्या योजना आखल्यास विद्यार्थ्यांना यश प्राप्त होत असल्याचा आत्मविश्वास डोंगरगाव येथील शिवजयंती व्याख्यानात मुख्यध्यापक रायभान जाधव यांनी केला.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, ज्ञानदान करुन पिढी घडविण्यासाठी स्वइच्छेने  शिक्षक होण्यास कुणी पुढे येईना, जगाचा पोशिंदा म्हणविल्या जाणारा शेतकरी बनायला अनइच्छुक ही मोठी खंत ,परंतू सैनिक बनून वीरमरण पत्करण्याठी अग्निविर समोर येतात ही बाब भूषणावह असल्याचे मत व्यक्त केले.

मोबाइल ज्युडो -लुडो आदी शारीरिक- मानसिक हानी होणारे खेळ न खेळता शिवरायांसारखे साहसी खेळ विद्यार्थ्यानी तरुणांनी खेळावे.

मा. जिजाऊ सारखे डोळस वृत माता भगिनींनी करत उपवास टाळून शारीरिक स्वास्थ अबाधित ठेवल्यास श्री शक्तीची चमक झळकेल.

शिवरायाचे कर्तुत्व, पराक्रम, दायित्व, कनवाळूपना वेळप्रसंगी कठोरता आदी बाबीवर बोलतांना त्याची सांगड बदलत्या काळाशी घालन्याचे आवाहन जाधव यांनी केले.

यावेळी पायल आग्रे, ऋत्विक आग्रे, रुपेश आग्रे या विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त केले. यावेळी रवींद्र परदेशी, किशोर परदेशी, सोपान जाधव, रामेश्वर आग्रे, अंबादास आग्रे, दिनकर म्हस्के, प्रभाकर आग्रे ,किरण आग्रे, आकाश आग्रे , अजिनाथ गायकवाड, राजेंद्र आग्रे, सैनिक बंधू निलेश गायकवाड 

आदीसह ग्रामस्थ हजर होते.संचलन रमेश गायकवाड यांनी केले तर कार्यक्रम समारोप गर्जा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताने करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवाजीराजे मित्र मंडळ वतीने परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments