सिल्लोड:-प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील पळाशी येथे एक आगळावेगळा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक या ठिकाणी गावातील सामाजिक कार्यकर्ते माननीय भागवत आनंद कराळे यांनी योग्य तो पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त गावात आगळावेगळा कार्यक्रम व्हावा म्हणून स्वखर्चाने घोडा तसेच स्वतःचे बँड म्युझिकल पार्टी शाळेच्या उपक्रमासाठी विनामूल्य मोफत दिले त्यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक माननीय अरुण पाटील, शिक्षिका उषा मोरे, यांनी योग्य ते मार्गदर्शन दिले. कार्यक्रमाच्या वेळेस गावातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप भाऊ लोखंडे,ग्रामपंचायत सदस्य दीपक गाडे,ग्रामपंचायत सदस्य,दिलीप भाऊ परदेशी,गावाची सरपंच अनिल भाऊ चव्हाण ग्रामपंचायत सदस्य सुदाम दिवटे, आधी गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आगळावेगळा कार्यक्रम केल्यामुळे तालुक्यात एकच सुरू आहे.