सुहास मोरे उत्कृष्ठ वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून सन्मानित,,,

 



वाशिम जिल्हा प्रतिनिधी

अजय गायकवाड 


 मालेगाव:-वने वन्यजीव व्यवस्थापन वन्यप्राणी रेस्क्यू व रोपवाटिका व्यवस्था पणा मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास मोरे यांना दिनांक २६जानेवारी रोजी यवतमाळ वनसंरक्षक वसंत घुले व उपवनसंरक्षक आनंद रेड्डी यांच्या हस्ते पदक मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले  त्यांच्या समवेतच मालेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील वनपाल गंगाधर चौरंगे,वनरक्षक गणेश झुंजारे,श्याम कुटे यांचाही उल्लेखनीय कामगिरी बद्दल पदक मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन वनसंरक्षकांनी सन्मान केला          जंगल आहे तर जल आहे, जल आहे तर जीवन आहे. याच जंगलाचे संरक्षण व संवर्धन करण्याकरिता वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे दिवस रात्र मेहनत करत असतात. अवैध वृक्षतोड अवैध उत्खनन , शिकारी या  वर आळा घालण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी दिवस रात्र जंगला मध्ये गस्त घालत असतात. आगी पासून जंगलाचे संरक्षण व्हावे म्हणून जीवाची पर्वा न करता आग विझवतात. त्यांचा या कामगिरी ची दखल घेऊन त्यांना  वने व वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाची  कामे करण्याचे प्रोत्साहन मिळत राहावे याकरिता दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान वनवृत्त स्तरावर केला जातो. त्यानुसार  2022-23 या वर्षा मध्ये वने वनजीव व्यवस्थापन, वन्यप्राणी रेस्क्यू व रोपवाटिका व्यवस्थापन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मालेगाव वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी  सुहास बळीराम मोरे ,वनपाल गंगाधर चौरंगे,वनरक्षक  शाम कुटे ,वनरक्षक  गणेश झुंजारे यांना २६जानेवारी रोजी यवतमाळ वनवृत्त स्तरावर वनसंरक्षक वसंत घुले व उपवनसंरक्षक आनंद येल्लू रेड्डी यांच्या हस्ते पदक  मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे त्यांच्या या कामगिरीचे वनपरिक्षेत्र विभागा सह जनतेत  कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments