सोयगाव :-प्रतिनिधी:- भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी आज विद्यार्थ्यां सोबत परीक्षे संदर्भात दृक्श्राव्य माध्यमातून संवाद साधला. विद्यार्थ्यांनी परीक्षा कालावधीत कोणताही ताणतणाव घेऊ नये, मुक्त वातावरणात परिक्षा द्यावी असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. या उपक्रमात सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाने व कै. बाबूरावजी काळे मराठी शाळा यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती पुष्पाताई काळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पवार, सोयगाव पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी श्री. रंगनाथ आढाव, कनिष्ठ विभागप्रमुख डॉ उल्हास पाटील, प्रा किशोर नाले, मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर एलिस, डॉ सुभाष पाटील, प्रा अनिल मानकर, प्रा टी आर शेख, प्रा राजेंद्र जाधव, प्रा विनोद चव्हाण, प्रा स्वाती चव्हाण, प्रा भारती पाटील यांच्या सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
