26"जानेवारी "74" प्रजासत्ताक दिना निमित्त सोयगाव पोलीस व शांताई फाउंडेशन याचा सयुक्त विधमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले,सोयगाव पोलिसांकडून रक्तदान शिबीर संपन्न,,,,


 ---------------------------------------

 👉🏻सोयगाव:- (प्रतिनिधी)    पोलीस स्टेशन सोयगाव येथे ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सिल्लोड विजयकुमार मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव पोलीस व शांताई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे उद्घाटन सोयगाव न्यायालयाचे न्यायमूर्ती अमोल इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले, ते प्रमुख पाहुणे होते, सोयगावचे तहसीलदार रमेश जसवंत, त्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले, सोयगाव पोलिसांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनमोल केदार, त्यांच्यासमवेत उपस्थित होते. पोलीस कर्मचाऱ्यांनीही रक्तदान केले.,,,

 👉🏻या शिबिरात तरुणांनीही सहभाग घेतला, यावेळी एकूण 16 जणांनी रक्तदानात सहभाग घेतला.74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.या शिबिरात रक्तदात्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले.,,,

 👉🏻सोयगाव पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिर प्रसंगी रक्तदान करताना फोटो न्यायमूर्ती अमोल इंगोले व सोयगाव तहसीलदार रमेश जसवंत व सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार.

Post a Comment

0 Comments