वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
वाशिम /मालेगाव-: राजुरा- जिल्हा परिषद जलसंधारण विभागा अंतर्गत येणा-या मालेगाव तालुक्यातील अनसिंग गांव तलावाच्या भिंतीला मधोमध मोठे भगदाड पडल्याने गेल्या चार दिवसां पासून या तलावातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने तलाव भिंती लगतच्या शेतकऱ्यां मधुन संताप व्यक्त केला जात आहे मालेगाव जलसंधारण विभागाच्या वतीने गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी अनसिंग येथील गाव तलावाची निर्मिती करण्यात आली परंतु सदरहू तलावाची संबंधिता कडून पुरेशी व योग्य प्रमाणात देखभाल दुरुस्ती होत नसल्याने या तलावाची सध्या स्थितीत विदारक अवस्था झाली आहे पावसाळ्यात तलाव भिंतीतुन अनेक ठिकाणी पाणी पाझरतांना दिसून येते तलावाच्या भिंतीवर बाभुळ,निंब,यासह मोठ्या प्रमाणात काटेरी झाडा झुडपांचे साम्राज्य निर्माण झाले आहे ते तलाव भिंतीसाठी धोकादायक ठरत आहेत सदरहु तलावाच्या निर्मिती वेळी भिंतीच्या पिचींग साठी नदी नाल्यातील टोळ दगडांचा वापर करण्यात आला त्यामुळे पिचींगचे काम व्यवस्थीत करण्यात आले नसल्याने या तलावात अपेक्षित कालावधी पर्यंत पाणी साठा टिकून राहत नाही शिवाय या तलावातील पाण्याचा विनापरवाना अनिर्बंध पणे पाणी उपसा होत असल्याने हा उन्हाळ्यात कोरडाठण्ण पडतो.