वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगांव :(लोकतक समाचार):-ता:30 जानेवारी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वर मेडशी येथे आज 30 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास ट्रकने चिरडल्याने महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मेडशी येथील आरोग्य वर्धिनीमध्ये कार्यरत परिचारिका शीला दिलीप कांबळे वय 54 वर्षे राहणार घोडमोड किन्ही ह्या आज 30 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास मेडशी येथील बॅंकेतून काम आटोपून आरोग्य वर्धिनीखडे पायी चालत जात असताना पाठीमागून पातुरकडून भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रक क्रमांक एम. पी. 09 एच. जी. 6967 ने चिरडल्यामूळे घटनास्थळीच शीला कांबळे यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मेडशी पोलिस चौकीत तैनात पोलिस हेड कॉन्स्टेबल गजानन पांचाळ पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सानप तसेच मालेगाव ठाण्यातून पोलिस उपनिरीक्षक गजानन चौधरी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह मालेगावच्या ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून अपघातास कारणीभूत ट्रक मालेगाव पोलिस स्टेशन मध्ये आणून अपघातामूळे अवरूध्द झालेली वाहतूक सुरळीत केली. सदर प्रकरणात ट्रक चालका विरूद्ध कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनेचा तपास ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांचे मार्गदर्शनात पोलिस हेड कॉन्स्टेबल गजानन पांचाळ करीत आहेत,,,