अमळनेर प्रतिनिधी प्रविण बैसाणे..
12 ऑक्टोंबर 2005 पासून माहिती अधिकार अधिनियम 2005 हा केंद्राचा कायदा देशात लागू होऊन आज सतरा वर्षे झाली तरी सुमारे 98 टक्के कार्यालयानी माहितीचा अधिकार कायद्याचे कलम चार व त्यात दिलेल्या 17 मुद्द्यांची माहिती जनतेसाठी जाहीर केलेली नाही किंवा अपडेट केलेली नाही त्यामुळे नागरिकांना कार्यालयांच्या कार्यपद्धतीची व निर्णय प्रक्रियेची अनुदानाची ,विविध योजना ची इत्यादी माहिती मिळाली नाही तरी कलम 4 ची माहिती जनतेसाठी जाहीर करावी असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे मास्टर ट्रेनर प्रा.अशोक पवार यांनी केले. अध्यक्षस्थानी मा गुलाबराव पाटील न्यायाधीश नाशिक उपस्थित होते. युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर या स्वयंसेवी संस्थेने माहिती अधिकार कायद्याचे प्रशिक्षण आयोजित केले होते .याप्रसंगी पुरुषोत्तम माळी व अजय भामरे या पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार माननीय गुलाबराव पाटील न्यायाधीश यांचे शुभहस्ते करण्यात आला. प्रा अशोक पवार यांनी लिहिलेले माहिती अधिकार कायद्याचे पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अशोक बिऱ्हाडे शिक्षण विस्तारअधिकारी यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय एडवोकेट तीलोत्तमा पाटील यांनी करून दिला .व्यासपीठावर अडवोकेट चव्हाण व दीपक गुप्ता, बन्सीलाल भागवत उपस्थित होते .याप्रसंगी दीपक गुप्ता यांनी आपल्या यशस्वी कथांचे कथन केले .अध्यक्षीय भाषणात मा गुलाबराव पाटील न्यायाधीश यांनी कायद्याचे महत्त्व विषद करून शेवटच्या माणसापर्यंत जनतेसाठी निर्माण केलेले कायदे पोहोचले पाहिजेत असे आवाहन केले. कार्यक्रमाला अमळनेरशहरातील विविध कार्यालयातील माहिती अधिकारी ,अपिलीय अधिकारी, समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, माहिती अधिकार कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष उपस्थिती शांताराम पाटील जयंतराव पाटील धनगर पाटील,महेंद्र बोरसे ,के डी पाटील, सुभाष चौधरी, प्रा. विजय वाघमारे ,यशवंत बैसाणे, अरुण देशमुख, मगन भाऊसाहेब, उमाकांत ठाकूर, रावसाहेब पाटील ,सोपान भवरे, भाऊसाहेब देशमुख ,गुणवंत पवार, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भटू पाटील, यतीन पवार, आनंद कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.
