बचतीचा अवलंब व कर्जाची परतफेड हे तत्त्व जोपासवे - कृषी मंत्री अब्दुल सत्तार साहेबांचे प्रतिपादन

 



 औरंगाबाद:- कन्नड/वासडी/पीशोर ( प्रतिनिधी ) दि.25, ग्रामीण भागातील लोकांनी बचतीचा मार्ग अवलंबून बँकेशी व्यवहार केला पाहिजे . घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची असते तर संस्था टिकते. पतसंस्थेमुळे ग्रामीण भागाचा विकास होण्यास मदत होते. त्यामुळे घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड केली पाहिजे असे प्रतिपादन कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी वासडी येथे सरस्वती को ऑपरटिव्ह पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी केले.


       पारदर्शक कारभार, ग्राहकांचा विश्वास आणि केलेल्या कर्जाची नियमित वसुली यामुळे पतसंस्थेची भरभराट होते, असे स्पष्ट करीत पतसंस्थेने ग्रामीण भागाच्या शेतकरी, तळागाळातील लहान व्यावसायिकांना अर्थ सहाय्य केले पाहिजे असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आतापर्यंत सर्वाधिक मदत करण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येत आहे या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.


       वासडी ता. कन्नड येथे नव्याने सुरू झालेल्या सरस्वती अर्बन को- ऑप क्रेडिट सोसायटीचे उद्घाटन सोहळा कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना मंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.


यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, माजी जि.प. सदस्य संजनाताई जाधव, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, केतन काजे, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. मनोज राठोड , नॅशनल सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, माजी उपनगराध्यक्ष शेख जावेद , उपसरपंच बाळासाहेब जाधव, राहुल पाटणी , संतोष कोल्हे, रत्नाकर पंडित, भूषण पंडित, संजय मुगले, भागवत महाराज आव्हाळे, बन्सीधर निकम, सचिन पाटणी, माणिक वाघ, रामहरी घुगे, रवींद्र अजमेरा , निसार शेख, सरपंच ज्ञानेश्वर ताठे, सभापती अप्पाराव घुगे, हस्ताचे सरपंच दीपक आखाडे, ज्ञानेश्वर पवार, विनोद जाधव, ज्ञानेश्वर गायकवाड, बापूराव काकडे, सर्जेराव आव्हळे, सचिन पाटनी, रमेश जाधव, संतोश खुर्दे, रवीअप्पा निकम, प्रकाश पटणी, कचरू जंगम, गणेश बोगाने, ज्ञानेश्वर ताठे, सुभाष जाधव, राहारी घुगे, नारायण सोनवणे, अनिल निकम, बाबासाहेब ठोंबरे, नितीन निकम, स्वप्नील निकम आदींची उपस्थिती होती.

 आलेल्या मान्यवरांचे सरस्वती अर्बनचया वतिने धनजी निकम, दिनेश निकम, संदीप निकम , प्रमोद निकम, दीपक गवलिकर, श्री.सर्कलवार, श्री.बी बी.पवार,एकनाथ राठोड, आदींनी स्वागत केले.


चौकट - कृषी मंत्री अब्दुल सत्तार साहेबांनी उपस्थित शेतकऱ्याशी संवाद साधत सिल्लोड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनला हजर राहण्याचे आवाहन केले.


प्रास्ताविक दिनेश निकम,संचलन रायभान जाधव यांनी केले तर आभार धनजी पाटिल निकम यांनी केले.

Post a Comment

0 Comments