मेडशी वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्यांचा हैदोस,शेतकरी हैराण*

 *


वाशिम

अजय गायकवाड


मेडशी वनपरिक्षेत्राच्या अंतर्गत जंगलालगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आता रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून आपल्या पिकाच रक्षण करायची वेळ आली आहे.कारण जंगलामध्ये दिवसेंदिवस हरीण,रोही,रानडुक्कर,माकड यांच्यासह अन्य वन्यप्राण्यांची मोठ्या प्रमाणावर संख्या वाढली आहे.आणि जंगलामधील चारा,पाणी संपत आल्यामुळे वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा शेतातील पिकाकडे वळवला आहे.शेतामध्ये सद्यस्थितीत तूर,हरभरा,कपाशी पिके आहे.सदर पिके परिपक्व आणि काढणीच्या अवस्थेत असून त्यावर उपाशी असणाऱ्या वन्यप्राण्यांनी ताकतिने आक्रमण केले आहे.अगोदरच ओल्या दुष्काळामुळे होरपळलेला शेतकऱ्यांना आता शेवटची आस ह्या पिकांकडून होती.मात्र वन्यप्राण्याकडून उभे पिक्कच उध्वस्त होत आहे.त्यामुळे जंगलालगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून आपले मुक्काम आणि संसार शेतात थाटले आहे.कारण वन्य प्राण्यांची वाढलेली संख्या आणि जंगलात त्यांच्यासाठी अन्न-पाण्याची नसलेली व्यवस्था त्यामुळे पिकांचे वन्यप्राण्यांकडून नुकसान होत आहे.म्हणून दिवसभर शेतात थांबून रात्रीच्या वेळी डोळ्यात तेल टाकून जीव धोक्यात घालुन शेतकरी आपल्या पिकाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करत आहे.वन्य प्राण्यांपासून होत असलेल्या नुकसानीचे अर्ज जंगला लगत शेती असलेल्या शेतकरी वर्गातून दरवर्षी वनविभागाकडे केले जातात.मात्र नुकसानीच्या तुलनेत भरपाई अत्यल्प प्रमाणात मिळत असल्याने शेतकरी वर्गातून योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.


*वनविभागाने जंगलाच्या बाजूने शेतीला जाळीचे सौरतार कूपन उभारून द्यावे जेणेकरून परिस्थिती नियंत्रणात राहील* - *अजिंक्य मेडशीकर*

Post a Comment

0 Comments