*केनवड ची घटना*
वाशिम
अजय गायकवाड
मो.7798258831
मालेगांव : 24 डिसेंबर
तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केनवड गावातील 42 वर्षीय व्यक्तीने 23 डिसेंबरच्या रात्री स्वतः च्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 24 डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता समोर आली आहे.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केनवड गावातील रहिवासी विष्णू बबन गांगवे (वय 42) याला दारूचे व्यसन होते. 23 डिसेंबरच्या रात्री दारूच्या नशेत त्याने राहत्या घरी लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
24 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच केनवडचे पोलीस पाटील माणिक खराटे यांनी सकाळी 9.45 वाजता शिरपूर पोलीस स्टेशनला कळवले पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल विनोद जायभाये हे केनवड येथे पोहचले व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रिसोडच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
सदर घटनेबाबत कैलास गोविंदा गांगवे यांनी 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 4.05 वाजता दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक 29 / 2022 नोंदवून फौजदारी संहितेच्या कलम 174 प्रकरण दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार सुनील वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सरनाईक करीत आहेत.
